![]() |
बागिलगे डुक्करवाडी विद्यालय बागिलगे येथे पाक्षिकाच्या सांगता समारंभावेळी विद्यार्थी व शिक्षक. |
माणगाव (राजेंद्र शिवणगेकर) / सी. एल. वृत्तसेवा
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव बी. एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा बी. एड. प्रशिक्षणाचा पाक्षिक कार्यशाळा बागिलगे डुक्करवाडी विद्यालय बागिलगे येथे सुरू होती. या अध्यापन समूहात बी. एड. कॉलेजचे एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी सहभागी होते. गेले पंधरा दिवस कोरोणाचे काटेकोर नियम पाळून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यानी शालेय विद्यार्थ्यांना अध्यापन करून आपल्या भावी शिक्षकी पेशाची मुहूर्तमेढ रोवली.
शिक्षकी पेशाचा अनुभव देणारी ही कार्यशाळा गेले पंधरा दिवस सुरू होती. आज या कार्यशाळेचा सांगता समारंभ विद्यालयाचे प्राचार्य एस. एल. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सुरुवातीला पाक्षिक कार्यशाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वरगांवकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन पाक्षिक कार्यशाळेत आलेल्या अनुभवाचे कथन केले. यावेळी स्नेहल पाटील, सुजाता नाईक ,इंदिरा पाटील ,किरण शिवणगेकर ,राजू कोरवी,प्रदिप कांबळे यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कार्यशाळेत आलेल्या अनुभवाचे कथन केले. बागिलगे डुक्करवाडी विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक एन. के .कित्तूर व एम. एन. शिवणगेकर यांनी पाक्षिक कार्यशाळेचे महत्त्व पटवून भविष्यात येणाऱ्या शैक्षणिक अडचणी बाबत सखोल मार्गदर्शन केले .यावेळी बी एड विद्यार्थ्यानी विद्यालयास पृथ्वी गोलाची प्रतिकृती भेट म्हणून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर .जी. शिवणगेकर यांनी केले तर आभार टी. व्ही .पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment