![]() |
जंगली हत्ती निवांतपणे गावातून जात असताना. |
आजरा (एस. के. पाटील) / सी. एल. वृत्तसेवा
जंगली हत्तीने थेट आजरा, गडहिंग्लज मार्गावरून गावातूनच प्रवास केल्याने ग्रामस्थांबरोबरच वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. हत्ती मडिलगे गावात मुख्य रस्त्यावर आल्याने हत्तीला पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली. याबरोबरच या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांची एकच धांदल उडाली.
या हत्तीची वाट चुकल्याने पश्चिम भागातील सोहाळे, चांदेवाडी मार्गे शिरसंगी येथे जाऊन ऊस भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे.हत्तीच्या ज्या भागात जाणार आहे त्या भागात परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने तैनात केले आहे. दरम्यान वनविभागाने तो विचलीत होऊन कोणतीही जीवीत हानी होऊ नये याची काळजी घेतली आहे. पण नागरिकांच्या अती उत्साहीपणामुळे हत्ती बिथरण्याची शक्यता आहे. हत्तीला जंगलाच्या दिशेने हुसकावण्यासाठी योग्य उपाययोजना सुरू असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.काल (दि.०७) रात्रभर प्रवास करत आज सकाळी हिरलगे, खोराटवाडी, जाधेवाडी परिसरात आला. पण पश्चिम भागात सध्या दोन हत्तींचे वास्तव्य असून हत्तींनी भात पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. चार दिवस शिरसंगी येथे भात व ऊस पिकाचे मोठे नुकसानीनंतर हत्ती हाजगोळी परिसरात दाखल झाला.हाजगोळी, पेद्रेवाडी येथेही बऱ्यापैकी नुकसान केल्यानंतर भादवण मार्गे थेट हिरलगे, खोराटवाडी असा प्रवास सध्या करत आहे.या परिसरात जंगलांचाअभाव असल्यामुळे थेट खोराटवाडी- जाधववाडी मार्गावर खुलेआम शेतात फिरत होता.आजरा- गडहिंग्लज या मुख्य मार्गावरवरून जाधववाडीच्या दिशेने कुच केले असून वन विभाग सतर्क बनला आहे.
No comments:
Post a Comment