कोरोना व पूरस्थितीमुळे स्व. नरसिंगराव पाटील याच्या पाचव्या स्मृतीदिनानिमत्त सर्व कार्यक्रम रद्द, म्हाळेवाडी येथे होणार प्रतिमा पूजन - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2021

कोरोना व पूरस्थितीमुळे स्व. नरसिंगराव पाटील याच्या पाचव्या स्मृतीदिनानिमत्त सर्व कार्यक्रम रद्द, म्हाळेवाडी येथे होणार प्रतिमा पूजन

 

माजी आमदार स्व. नरसिंगराव पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        दौलत साखर  कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, चंदगड मतदार संघाचे माजी आमदार स्वर्गीय नरसिंगराव पाटील  हे कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारी व राजकीय चळवळीतील एक धडाधडीचे कार्यकर्ते व सच्चे समाज सेवक होते. ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गावचे सरपंच व सोसायटीचे अध्यक्ष यापासून ते महाराष्ट्राच्या विधानसभेत तसेच सहकारी क्षेत्रातील देशपातळीवरील महत्त्वाच्या संस्थांमध्ये जबाबदारीच्या पदावर काम केले. कृषी उद्योगाच्या क्षेत्रात जगाच्या पातळीवर विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे त्यांनी लक्ष पुरवले होते. 

                                              जाहिरात

जाहिरात

         जगात होणारे नवे तंत्रज्ञान व सुधारणा लक्षात घेऊन त्यांनी चंदगडच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट उपसले. त्यांच्या आजच्या पाचव्या  स्मृति दिनानिमित्त म्हाळेवाडी (ता. चंदगड) या मूळगावी  आज दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी ११वाजता प्रतिमा पूजन कार्यक्रम होणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव व चंदगड तालुक्यात उध्दभवलेली पूरस्थिती यामूळे स्व. नरसिंगराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. स्व. नरसिंगराव पाटील प्रेमी  कार्यकर्त्यांनी हार-तुरे आणण्याऐवजी पुरग्रस्त नागरिकांना सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment