मास्क व सॅनिटायझर वाटून अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा , मुलांनी घेतली कोरोनाला हरवण्याची शपथ - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2021

मास्क व सॅनिटायझर वाटून अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा , मुलांनी घेतली कोरोनाला हरवण्याची शपथ


तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा
    आजच्या आधुनिक जीवनशैलीत चित्रपट, मालिका पाहून वाढदिवसाचे वारे ग्रामीण भागात शाळा, कॉलेजमध्ये पसरलेय यात काही नवल नाही.
प्रत्येक मुलाला वाटत असतं की आपला वाढदिवस अगदी थाटामाटात व्हावा.
वाढदिवस म्हटलं की चॉकलेट, केक, महागडया भेटवस्तू हे सगळं आलचं. पण याला फाटा देऊन चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ग्रंथालयाला पुस्तके देऊन मुले वाढदिवस साजरा करतात. कोरोना सारख्या महामारीमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.कोरोना रुग्णसंख्या नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू आहेत. मास्क, सॅनिटायझर वापरणं ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. हीच बाब लक्षात घेऊन श्री. शिवाजी गायकवाड यांनी आपला पाल्य कु. निलेश गायकवाड  याच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्याना सातशे मास्क व वीस लिटर सॅनिटायझर भेट दिली. ते सध्या कोलिक म्हाळुंगे येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. कु.निलेश हा नुकताच इ.१० वी ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी प्राचार्य आर.आय. पाटील, पर्यवेक्षक एन.डी. देवळे, आर.पी. पाटील, टी. एस. चांदेकर, एम.व्ही.कानूरकर, एस.जी. साबळे, बी.आर.चिगरे, टी.व्ही. खंदाळे, पी.एच. सुतार उपस्थित होते.


No comments:

Post a Comment