लकीकट्टे धरण क्षेत्रात वृक्षलागवड, शिवणगे येथील तरुणांचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2021

लकीकट्टे धरण क्षेत्रात वृक्षलागवड, शिवणगे येथील तरुणांचा उपक्रम

लकीकट्टे धरण : वृक्षलागवड प्रसंगी प्रकाश राऊत, अरुण पाटील आप्पाजी पाटील आदी.


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

लकीकट्टे धरणक्षेत्र (ता. चंदगड) येथे शिवणगे (ता. चंदगड) येथील तरुण मंडळ व कोल्हापूर येथील के. के. व्हीयन्स-वसुंधरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जातींची 150 हून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. फाऊंडेशनच्या वनराई या उपक्रमांमधून सदर झाडे उपलब्ध झाली असून स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त व कै. सुशांत गजानन राऊत याच्या सहाव्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी के. के. व्हीयन्स-वसुंधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राऊत  म्हणाले, जर प्रत्येकाने वर्षातून एक झाड लावून जगवले तर आपल्या देशाच्या पर्यावरण रक्षणात फार मोठा बदल घडून येईल. यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावयास हवा.


 सरपंच अरुण पाटील म्हणाले, जगभर बिघडत चाललेले पर्यावरण रोखण्यासाठी वृक्षारोपण हा महत्त्वाचा उपक्रम आहे. वृक्षलागवड ही एक चळवळ बनण्याची गरज आहे. 

यावेळी उपसरपंच आप्पाजी पाटील, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष दयानंद पाटील, निवृत्त वननिरीक्षक एन. आर. पाटील, ग्रामसेवक साखरे, पंकज पाटील यांच्यासह अन्य शेकडो तरुण उपस्थित होते.



 


No comments:

Post a Comment