तारेवाडी येथील लिंगदेव दुध संस्थेची वार्षिक सभा उत्साहात, विविध विषयावर चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2021

तारेवाडी येथील लिंगदेव दुध संस्थेची वार्षिक सभा उत्साहात, विविध विषयावर चर्चा

तारेवाडी : लिंगदेव दुध संस्था वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिमा पूजन  प्रसंगी उपाध्यक्ष दिनकर पाटील, संचालक धोंडीबा देसाई,  गोविंद शिटयाळकर आदि

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील श्री लिंगदेव सहकारी दुध व्यावसाईक संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात खेळीमेळीत झाली. उपाध्यक्ष दिनकर पाटील अध्यक्षस्थानी होते.  

          संचालक गोविंद शिटयाळकर यांनी स्वागत केले. संचालक नारायण भारती  यांनी प्रास्ताविक केले. सचिव संदीप पाटील यांनी आवाहल वाचन केले. संस्थेला आर्थिक वर्षात १ लाख ५६ हजार रुपयांचा नफा झाला. सभासदांना प्रतिलिटर दोन रुपये प्रमाणे बोनस वाटप झाला. संस्थेला आर्थिक वर्षात सर्वाधिक दुध पुरवठा करणारे  दुध उत्पादक अनुक्रमे प्रथम, द्वितीय  व तृतीय क्रमांक मिळविलेल्या उत्तम पाटील, मधुकर भारती, शिवाजी बोलके  यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, शाल, श्रीफल देवून सत्कार झाला.                     परशराम देसाई, कृष्णा पाटील, नारायण शिटयाळकर, आप्पा भारती, नाना पाटील, मष्णू देसाई यांनी चर्चेत सहभाग घेतला. सभासदांनी विचारेल्या प्रश्नांना संस्था पदाधिकारी, संचालक मंडळ यांनी उत्तरे देऊन शंकाचे निरसन केले.  संचालक  संभाजी मेटकर, शेवंता पाटील, उपसरपंच युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मेटकर, रेखा धनके, दयानंद देसाई, शोभा तुपूरवाडकर, दत्तात्रय पाटील, राजन पाटील, जयराम तुपूरवाडकर, गंगाराम पाटील, नर्मदा तुपूरवाडकर यांच्यासह सभासद, दुध उत्पादक, ग्रामस्थ उपस्थित होते. माजी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक धोंडीबा देसाई यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment