``प्लॉस्टीक शिवाय भविष्य`` या विषयावर शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा - माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2021

``प्लॉस्टीक शिवाय भविष्य`` या विषयावर शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा - माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारतेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा

         प्लॉस्टिकमुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी विद्याथ्यांच्यामध्ये जाणीव व जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. प्लॅस्टिक शिवाय भविष्य या विषयावर शालेय स्तरावर खालील गटामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करणेत येणार आहे.

                     निबंध स्पर्धेचे विषय -  इ. ८ वी ते १० वी 

१) पस्टिकचा कमी वापर, पुर्नवापर व प्रक्रिया करणेसाटी पोस्टक कचरा व्यवस्थापनाची तत्वे

२) शून्य  प्लास्टिक कचरा, नाविन्यपूर्ण कल्पना राविणेसाठी शालेय कार्यक्रम

३) एकदाच वापरात येणान्या प्लॅस्टिक चा वापर व परिणाम कमी करणेसाठी अन्य पर्यायी माध्यमातून  प्लॅस्टिकची उत्पादने.

                              इ. ११ वी १२वी

 १) प्लस्टिक कचरा पासून पुननिर्मितीसाठी एक चक्रीय अर्थव्यवस्था निर्माण करणेसाठी नागरिकांची भूमिका.

२) एकल पस्टिक वापरामुळे होणारे प्रदूषण कमी करणेसाठी युवकांची भूमिका

३) मुख्य प्रवाहात वापरल्या जाणाऱ्या एकल पस्टिक वस्तूंना नाविन्यपूर्ण व सर्जनशीलतेचे पर्याय

                                   स्पर्धेचे नियम

१) प्रत्येक शाळेने इंग्रजी, हिंदी व प्रादेशिक भाषेमध्ये सर्वोत्तम ३ निबंध सादर करावेत.

२) स्पर्धा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार आहे.

३) स्पर्धेसाठी निबंध सादर करणेची तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे

४) निबंध सादर करताना इंग्रजीसाठी १२ व हिंदी आणि मराठी भाषेसाठी १४ फॉन्ट असावा. दोन ओळीमधील अंतर १.५ असावे.

५ ).निबंधासाठी शब्दमर्यादा ५०० ते ८०० अशी आहे.

६) निबंध हे पीडीएफ फाईल स्वरुपातच सादर करणे आवश्यक आहे.

७)  विद्यार्थ्यांनी निबंध कार्यालयाच्या coseckop@gmail.com या ईमेलवरच पाठवावेत,

८) प्रत्येक विद्यार्थी एकच निबंध सादर करू शकेल.

९) इ. १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी ३१ /३/२०२१ रोजी वयाची मर्यादा १८ वर्षे असावी.

१०) प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्याथ्यांचा सहभाग वाढविणेसाठी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क किंवा व्हाट्सअपच्या माध्यमातून च्या माध्यमातून  संपर्क साधावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment