भारत देशातील १२ ते १७ वयोगटातील मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोविड १९ वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी दिली.
देशात या वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. ही लस सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना दिली जाईल. यासाठीची परवानगी मिळली असून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे.
१२ ते १७ वयोगटातील मुलांपैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत किंवा विषाणूमुळे मृत्यू होण्याची शक्यता नाही. उलट, त्यांच्या पालकांमध्ये १० ते १५ पटीने आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याची शक्यता असल्याने १८ ते ४५ गटाचे लसीकरण करण्यास प्राध्यान्य देण्यात आल्याचे डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment