गडहिंग्लज येथे गणेशोत्सव संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांसोबत पोलिस पाटलांची बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2021

गडहिंग्लज येथे गणेशोत्सव संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांसोबत पोलिस पाटलांची बैठक

अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड पोलिस पाटलांना मार्गदर्शन करताना.

गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा

        आगामी गणेशोत्सव निमित्त छ. शाहू हॉल, नगर परिषद गडहिंग्लज येथे पोलीस अधिकाऱ्यांसोबत पोलीस पाटील व पोलिसांना शासकीय नियमांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

        या बैठकित अप्पर पोलीस अधिक्षक  जयश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, आजरा पोलीस ठाणेचे स. पो. नि. बालाजी भांगे, गडहिंग्लज पोलीस ठाणेचे प्रभारी  सुनिल हारूगडे, नेसरी पोलिस ठाणेचे अविनाश माने, तसेच नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, मुख्याधिकारी (गड. नगर परिषद) तसेच बिडिओ, आजरा गडहिंग्लज तालुक्यातील पोलीस पाटील व गणेश मंडळांचे पदाधिकारी होते.

No comments:

Post a Comment