'संत गजानन ' पॉलिटेक्निकच्या उन्हाळी परिक्षेमध्ये ऋतुजा देसाई प्रथम, 329 विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी गुण - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2021

'संत गजानन ' पॉलिटेक्निकच्या उन्हाळी परिक्षेमध्ये ऋतुजा देसाई प्रथम, 329 विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी गुण

ऋतुजा देसाई

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकच्या एम. एस. बी. टी. ई. कडून घेण्यात आलेल्या उन्हाळी 2021 परीक्षेचा निकाल घोषित झाला असून यामध्ये 529 विद्यार्थीना विशेष प्राविण्य, 427 प्रथम श्रेणीत, 36 विद्यार्थी 90 टक्केहून अधिक तर विविध विभागातील 329 विद्यार्थीनी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तसेच महाविद्यालयातून मेकॅनिकल विभागातील ऋतुजा देसाई हिने 98.26 टक्के गुण मिळवून  महाविद्यालयात प्रथम, संकेत होडगे 96.17, विनायक हावळ 95.90, पुनम मस्ती 95.54, विनायक मुरुडेकर 95.31 यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवला आहे.

      प्रथम वर्ष विभागातून नेहा कुलकर्णी 94.63, श्रद्धा पट्टणशेट्टी 92.93, चेतना पाटील 91.94, सिद्धी हावळ 91.43, प्राची चोथे 90.69, टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.

         इतर विभागाचा निकाल पुढीलप्रमाणे- तृतीय वर्षे मेकॅनिक मधून रुतूजा देसाई 98.26, विनायक हावळ95.90, अक्षय तळेवाडीकर 95.38, कॉम्प्युटर विभागात संकेत होडगे 96.17, पुनम मस्ती 95.54, विनायक मुरडेकर 95.31,सिव्हिल मध्ये सुमित बाबर 95.3, श्रध्दा पट्टणशेट्टी 92.93,आकांक्षा पाटील92.74, इलेक्ट्रिकल मध्ये सुशातं दरुटे 95.44, श्रेयश मोरे94.72, सादिया पठाण 92.18 इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मधून  अनुभव पाटील 93.47, पूजा देसाई 92.18, महेश कांबळे90 टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.

         सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, उपप्राचार्य प्रा. आर. एस. पाटील, सर्व विभागप्रमुख व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले तर संस्थाध्यक्ष डॉ. आण्णासाहेब चव्हाण यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment