सौ. स्नेहा रोहित दळवी |
तेऊरवाडी / एस. के. पाटील
तेऊरवाडी (ता. चंदगड) गावचे सुपुत्र रोहित रमेश दळवी ( B. E. I.T. (Mumbai) M. S. अमेरिका ) यांची पत्नी सौ. स्नेहा रोहित दळवी (B. E. Electrical, MBA in HR, बेंगलोर) यांची (LOYOLA, University) शिकागो, अमेरिका या नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये graduate specialization in human resource management ह्या उच्च पदवी शिक्षणाकरिता प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे महिण्याभरातच तेऊरवातील चौघे जन उच्चपदस्थ नोकरी व शिक्षणासाठी सातासमुद्र पार गेल्याने तेऊरवाडीत या सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.
तेऊरवाडी गावची कोरडवाहू गाव म्हणून शासनदरबारी नोंद असली तरी गुणवत्तेच्या बाबतीत मात्र अजिबात कोरडवाहू नाही. देशसेवा करणाऱ्या जवानांची संपूर्ण चंदगड तालूक्यात सर्वाधिक संख्या याच गावची आहे. जसे कालकुंद्री गाव प्रशासकीय सेवेमध्ये अग्रेसर तसे तेऊरवाडी देशसेवेमध्ये अग्रेसर तर आहेच पण जगाच्या कानाकोपऱ्यात देखील येथील मुले पोहचली आहेत. येथील एका सामान्य कुटूंबात जल्मलेल्या व पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सौ. गिता व रमेश रामचंद्र दळवी यांचा मुलगा रोहित याने Bridgeport University New York अमेरिका येथून मास्टर ही उच्च पदवी संपादन करून शिकागो येथील एका नामांकित कंपनित सिनिअर सॉप्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत आहे. रोहितच्या पत्नीला पन शिकागोच्या नामांकित विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिण्यात याच गावातील वैभव पाटील व सौ. संपदा पाटील हे दोघे पती - पत्नी नोकरी व शिक्षणानिमित्य जर्मनीला गेले. त्यानंतर लगेचच रोहित व स्नेहाला संधी मिळाल्याने तेऊरवाडी ग्रामस्थाकडून या सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment