दिंडलकोप येथील शेतकरी यल्लापा जाधव यांच्या शेतातील बटाटे किड पडल्याने असे कुजून जात आहेत. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
दिंडलकाेप (ता. चंदगड) परीसरातील बटाटे पिकांवर किडी प्रादुर्भाव झाला असुन संपुर्ण बटाट्याला किड लागल्याने शेतकरी चिंताग्रस्थ बनला आहे. येथील शेतकरी बटाटा पीक मोठया प्रमाणात घेतात. पण हजारो रुपये खर्च करून हाताशी आलेले बटाटा पिक नुकसानीत आहे. त्यामुऴे शेतकरी चिंतातुर आहेत.
बटाटे पिकांची पहाणी केली असता जमिनित प्रत्येक बटाट्याला किड.,अळी लागली आहे. पाऊसाची उघडझाप आहे. त्यामुऴे अयाेग्य वेऴी पाऊस जास्त झाल्याने बटाट्यांची पिके धाेक्यात आली आहेत. येथील शेतकरी यलाप्पा संतू जाधव यांच्या शेतातली 5 एकर बटाटे किड ग्रस्त झाले असुन लाखाेंचे नूकसान झाले असल्यांची खंत सी. एल. न्यूजशी बोलताना व्यक्त केली. त या भागातील शेतीची पहाणी करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment