 |
शिवसेनेच्या वतीने शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्यासाठी निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी. |
गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
गडहिंग्लज शहरातील महालक्ष्मी यात्रेमध्ये अनुचित प्रकार ,महिलांची छेडछाड, चोरी व गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यात्रा कमिटीने शहरात 21 ठिकाणी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवून त्यांची स्क्रीन पोलीस ठाणेत बसविली असून त्याची देखभाल व खर्च पोलीस ठाणेवर यात्रा कमिटीने सोपवली आहे. मात्र या २१ कॅमेऱ्यापैकी काही कॅमेरे बंद झाले आहेत. तर काही इमारतीवर अडकून आहेत तर काही शो चे कॅमेरे झाले आहेत. सदर कॅमेरे हे गणेशोत्सव जवळ आलेने सणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंद सी सी टि व्ही कॅमेरे तात्काळ सुरु करावेत, अशा मागणीचे निवेदन गडहिंग्लज पोलीस ठाणेच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल शिसाळ यांचेकडे शिवसेनेच्यावतीने देण्यात आले आहे. निवेदनावर शिवसेना उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी,प्रकाश पाटील यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment