गणेशोत्सव मंडळ मार्फत किणी येथे पशुधन आरोग्य शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2021

गणेशोत्सव मंडळ मार्फत किणी येथे पशुधन आरोग्य शिबीर संपन्न

 

किणी येथे पशुधन आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना शंकर मनवाडकर उपस्थित पशूवैद्यकीय अधिकारी व शेतकरी.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

  सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या किणी, ता. चंदगड येथील जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ग्राम पंचायतीच्या सहकार्याने नुकतेच पशुधन आरोग्य शिबिराचे आयोजन केले. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती चंदगड अंतर्गत "कामधेनू दत्तक ग्राम योजना" योजनेंतर्गत उपक्रम पार पडला. सरपंच संदीप बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमिक शिक्षक समिती राज्य उपाध्यक्ष शंकर मनवाडकर यांनी उद्धघाटन केले. प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष संजय कुट्रे यांनी केले. यावेळी डॉ विनायक पाटील, डॉ नामदेव कुट्रे, डॉ अरुण मनगुतकर, डॉ सावंत, डॉ नंदकुमार नौकुडकर या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात ३१० जनावरांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आला.

  यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जोतीबा व्हडगेकर, उपसरपंच जोतीबा हुंदळेवाडकर, संभाजी हुंदळेवाडकर, विनायक बिर्जे, इराप्पा नावलगी, यशवंत बिर्जे, गणपत जोशीलकर, मारुती बिर्जे, अमर जोशीलकर, समीर मुल्ला, जोतीबा बिर्जे व शेतकरी उपस्थित होते. सुनील मनवाडकर यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment