नागरिकांची कामे वेळेत करुन हेलपाटे कमी करावेत - नूतन प्रांताधिकारी वसुंधरा बारावे - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2021

नागरिकांची कामे वेळेत करुन हेलपाटे कमी करावेत - नूतन प्रांताधिकारी वसुंधरा बारावे

प्रांताधिकारी वसुंधरा बारावे यांचा सत्कार करताना स . पो . नि . सुनिल हारूगडे

आजरा / सी. एल. वृत्तसेवा

       आजरा तहसीलदार कार्यालयाकडे विविध कागदपत्रासाठी येणाऱ्या नागरिकांची कामे तात्काळ करून त्यांचे हेलपाटे कमी करावेत असे आजरा भूदरगड च्या नूतन प्रांताधिकारी श्रीम वसुंधरा बारावे यांनी आजरा तहसीलदार कार्यालयात सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले. स्वागत तहसीलदार विकास अहिर यांनी केले.

         प्रास्ताविक नायब तहसीलदार डी .डी. कोळी यांनी केले. यावेळी नूतन प्रांताधिकारी श्रीम  वसुंधरा बारावे यांचा सत्कार तहसीलदार विकास अहिर, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, स. पो. नि. सुनील हारुगडे, निवासी नायब तहसीलदार संजय कांबळे,मंडळ निरीक्षक जि बी पाटील,महसूल सहायक सुजाता काजीरणेकर, सोनाली सुतार,उपलेखपाल सुरेखा शेलार,लता जाधव  यानी केला . यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment