जिल्हा बॅकेने ३४ कोटी रुपये दौलतच्या कर्ज खात्यावर जमा करावे - दौलतच्या माजी संचालकांचे जिल्हा बॅकेला निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2021

जिल्हा बॅकेने ३४ कोटी रुपये दौलतच्या कर्ज खात्यावर जमा करावे - दौलतच्या माजी संचालकांचे जिल्हा बॅकेला निवेदन

जिल्हा बॅकेने ३४ कोटी रुपये दौलत कारखान्याच्या कर्ज खात्यावर जमा करावे या मागणीचे निवेदन जिल्हा बॅक अधिका-याना देताना दौलतचे संचालक मंडळ

विशेष प्रतिनिधी

         हलकर्णी (ता.चंदगड) येथील दौलत साखर कारखाना चालविण्यासाठी घेतलेल्या न्युट्रीएंट्स ॲग्री फ्रुट्स प्रायव्हेट लि.गोकाक या कंपनीने केडीसीसी बँकेत भरलेली ३४ कोटी रुपये किरकोळ खात्यावर जमा करून घेतली आहे. ती सर्व रक्कम दौलत कारखान्याच्या कर्ज खात्यावर जमा करावी आणि त्याचा जमाखर्च द्यावा, अशी मागणी दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक जाधव व संचालक मंडळाने निवेदनाद्वारे जिल्ह्य बॅँकेकडे केली आहे.

          दौलत साखर कारखाना तोट्यात गेल्यामुळे अनेक वर्ष बंद अवस्थेत होता. या कारखान्यावर केडीसीसी बँकेचे कर्ज होते. त्यामुळे केडीसीसी बँकेने ४० कोटीच्या व्याजापोटी हा कारखाना २०१६ साली न्युट्रीएंट्स ॲग्री फ्रुट्स प्रायव्हेट लि. गोकाक या कंपनीला ६७ कोटीला चालवायला दिला होता. त्या बदल्यात कंपनीने जुलै २०१६ आणि मार्च २०१७ मध्ये मिळून अंदाजे ३४ कोटी रु. रक्कम केडीसीसी बँकेत भरले होते. सदरची रक्कम दौलत कारखानाच्या कर्ज खात्यावर जमा न करता ती रक्कम किरकोळ खात्यात जमा करण्यात आली होती. दरम्यान, न्युट्रीएंट्स कंपनीकडून कराराचा भंग झाल्यामुळे हा कारखाना अथर्व ट्रेडर्स या कंपनीला ६७ कोटीला चालवायला दिला. न्युट्रीएटस कंपनीने दिलेली ३४ कोटी रु. रक्कम या जमाखर्चात न पकडता आहे तसेच ६७ कोटीला अथर्व कंपनीला दिला. या व्यवहारावर संचालक मंडळाचा आक्षेप आहे. याबाबत गेली दोन वर्षे बँकेला वारंवार भेटूनही बँक अधिकारी दाद देत नाहीत. आता शेवटचा पर्याय म्हणून निवेदन दिले आहे. यानंतरही दखल घेतली नाहीतर कोर्टाची पायरी चढावी लागणार आहोत, असे दौलतचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, जगन्नाथ इंगवले, उत्तम पाटील, अशोक पाटील, बाबुराव गावडे, पुंडलिक पाटील,वसंत निकम, शिवाजी तुपारे, बाबुराव शिंदे, शिवाजी हसबे, पुंडलिक पाटील, तुकाराम पाटील आणि दौलतचे कार्यकारी संचालक मनोहर होसुरकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment