शंभर वर्षातील दाखले मिळणार एका क्लिकवर, विद्या मंदिर किणीचा जिल्हयातील पहिलाच प्रयोग यशस्वी, वाचा नेमकी काय आहे संकल्पना........ - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2021

शंभर वर्षातील दाखले मिळणार एका क्लिकवर, विद्या मंदिर किणीचा जिल्हयातील पहिलाच प्रयोग यशस्वी, वाचा नेमकी काय आहे संकल्पना........

शासकीय कार्यालयातील दस्तावेज जतन करण्यासाठी डिजिटल प्रणाली उपयुक्त - सभापती ॲड अनंत कांबळे

किणी (ता. चंदगड) येथे शालेय जनरल रसिस्टर डिजीटलायझेशन उद्घाटन प्रसंगी बोलताना सभापती ॲड. अनंत कांबळे व सोबत मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          शाळा, ग्रामपंचायत व शासकीय कार्यालयातील महत्त्वाचे रेकॉर्ड दस्तावेज जतन झाले पाहिजे.  हा अमूल्य ठेवा काळाच्या ओघात जीर्ण व नामशेष होण्याची शक्यता आहे तो निरंतर शाबूत ठेवण्यासाठी या रेकॉर्डचे डिजिटलायझेशन करता येते. हे आप्पाराव पाटील यांनी दाखवून दिले असे प्रतिपादन चंदगड  पंसचे सभापती ॲड. अनंत कांबळे यांनी केले. ते किणी (ता. चंदगड) येथील जि. प. प्राथमिक शाळेतील जनरल रजिस्टर चे डिजिटल रूपांतर प्रसंगी उद्घाटक  म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष दयानंद मोटूरे होते.

         दीप प्रज्वलन उपसभापती मनीषा शिवणगेकर यांनी केले, प्रास्ताविक विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे यांनी केले. डिजिटल प्रणालीचे उद्घाटन सभापती कांबळे व जि प सदस्य कल्लाप्पांना भोगन यांचे हस्ते झाले. शाळेचे मुख्याध्यापक आप्पाराव पाटील यांनी परिश्रमपूर्वक ११० वर्षांतील सर्व जनरल रजिस्टर बुके डिजिटल स्वरूपात जतन केली आहेत. यामुळे जीर्ण रजिस्टरमधील नोंदी शोधण्याचा त्रास वाचणार असून शंभर वर्षापूर्वीच्या नोंदीही पाच मिनिटात देणे शक्य झाले आहे. कोवाड बीटमधील उपस्थित ५० प्राथमिक, माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना प्रात्यक्षिकाद्वारे पाटील यांनी मार्गदर्शन केले. याकामी लागणारा संपूर्ण खर्च शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व सेवानिवृत्त शिक्षक वसंत जोशिलकर  यांनी आपल्या दिवंगत पत्नी सुगंधा जोशिलकर यांच्या स्मरणात स्मरणार्थ देणगी स्वरुपात दिला. 

         याप्रसंगी कल्लाप्पाण्णा भोगण, सुकुमार पाटील, कॉन्ट्रॅक्टर विलास पाटील, शिक्षक बँक चेअरमन आण्‍णासो शिरगावे, माजी संचालक निकम, रमेश हुद्दार, विद्यमान संचालक शिवाजी पाटील, एच. एन. पाटील, शंकर मनवाडकर, समन्वय समितीचे अध्यक्ष सदानंद पाटील आदींची भाषणे झाली. यावेळी सरपंच संदिप बिरजे समाजसेविका मोनिका डांटस, संघटना पदाधिकारी  अशोक नौकुडकर, के. व्ही. पाटील, विलास माळी, कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर, सेवानिवृत्त शिक्षक संघटना, शाळा व्यवस्थापन व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले. आभार अनंत पाटील यांनी मानले. 

           या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे किणीची प्राथमिक शाळा राज्यात नावारूपाला आणण्याचे मुख्याध्यापक आप्पाराव पाटील यांनी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शालेय दस्त डिजिटल करण्याची गरज
१ सर्वात जुनी शाळा
२ रजि जुनी
३ कागद जुना ठिसूळ झालेला
४ वापरास अवघड
५ नोंदी गहाळ होण्याची शक्यता
६ दाखला शोधताना खूप वेळ
७ शैक्षणिक नुकसान टाळणे
८ वेळेची मर्यादा येते
९ अचुकपणा येतो
१० मुळ स्थिती दस्तऐवज याचे जतन 

उद्देश -
१ जुनी दस्तऐवज जपणूक करणे
२) जातीचा दाखला दाखला यासाठी पुरावा वेळेत उपलब्द करुन देणे
3 मानवी हस्तक्षेप व चुका टाळणे 
४ वेळ व पैसा यांची बचत करणे .
५ विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान टाळणे 
६ गावची शैक्षणिक वारसा विश्लेषण करणे
७ साक्षर निरक्षर शोध घेणे व त्यावर उपाय योजना करणे

फायदे -
१ शैक्षणिक दस्त ऐवज जपून ठेवता येतात
२ कोठेही केव्हांही आणि कधीही दाखला उपलब्द करता येतो
३ ऐतिहासिक संपतीची जपणूक करता येते
४ कोणाला ही वापरताना सोपे वयाचा
५ मानवी हस्तक्षेप व चुका होत नाही
६ कमी वेळेत जलद गतीने कामाची पूर्तता होते
७ दस्त ऐवज कायम स्वरूपी डिजिटल स्वरुपात ठेवता येतात
८ कोणाकडे कोठेही ठेवता येतात
९ कागद जुना असल्यामुळे ठिसुळ होतो तुकडे होतात व पुरावे नष्ठ होण्याचे वाचतील.
१० गावची शैक्षणिक परंपरा याचे विश्लेषण करता येते
११ शैक्षणिक नुकसान टाळता येते
१२ वस्तू स्थिती दर्शक पुरावा म्हणून वापरता येतो
१३ ऑन लाईन व ऑफ लाईन काम करता येते
१४ ) ईमेल वॉटस ॲप टेलीग्राम याद्वारे 
उपलब्ध करून देता येते.

No comments:

Post a Comment