संत गजानन' आयुर्वेद महाविद्यालयामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2021

संत गजानन' आयुर्वेद महाविद्यालयामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन

महागाव येथील आयुर्वेद महाविद्यालयात पुस्तक प्रकाशन प्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. विशाल पाटील, डॉ. स्वरुप कुलकर्णी डॉ. मंगल मोरबाळे व इतर मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक व लेखक डॉ. विशाल पाटील, डॉ. स्वरुप कुलकर्णी, डॉ. शर्मिला पाटील लिखित आन्तरराष्ट्रीय प्रमाण ग्रंथ क्रमांक (ISBN) मिळालेल्या दोन आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या  संदर्भग्रंथपुस्तकाचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आला. संस्थाध्यक्ष डॉ. आण्णासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.              

        यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या फिजीओलॉजीकल (क्रियात्मक) अस्पेक्टस ऑफ अस्थी-मज्जा धातू व फण्डा मेंटल अस्पेक्टस इन शारीरस्थान या पुस्तकातून आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व आयुर्वेदिक अभ्यासकांना उपयुक्त माहिती साध्या व सहज पद्धतीने समजण्याकरीता लेखकांनी विशेष प्रयत्न केले आहेत.                                  

        यापुर्वी डॉ. विशाल पाटील यांच्या ३ पुस्तकांचे, १६ संशोधन पेपर  आतंरराष्ट्रीय संशोधन जर्नलमध्ये प्रकाशन झाले.आहे. तसेच त्यांना पी.एच. डी. शोधकार्यासाठी सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बेस्ट रिसर्चर म्हणून सन्मानित आहेत. वेगवेगळ्या आतंरराष्ट्रीय जर्नल संपादकीय मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक यांच्या रिसर्च मेथडॉलॉजी विभाग फॅकल्टी मेम्बर म्हणून करिता म्हणून कार्यरत आहेत.              डॉ. स्वरूप कुलकर्णी सद्या रचना शारीर पी. एच. डी. करीता भारती विद्यापीठ  पुणे येथे त्याचे संशोधन कार्य सुरु आहे. यापूर्वी ५० संशोधन पेपर प्रकाशन आतंरराष्ट्रीय संशोधन जर्नल मध्ये झाले आहे. त्यांची तीन पुस्तकांचे यापूर्वी प्रकशित आहेत. तसेच वेगवेगळ्या राष्ट्रीय जर्नल संपादकीय मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय बेस्ट फ़ॅकल्टी हा सन्मान प्राप्त आहे.                                                  यावेळी डॉ. संजय चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण  सचिव डॉ. बाळासाहेब चव्हाण,  प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे व शिक्षकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment