![]() |
कार्यक्रमावेळी पूणे विभाग शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर व इतर शिक्षक |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
'ग्रामीण भागात खरी बुध्दिमत्ता लपली आहे. या बुद्धिमतेला जगासमोर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने शिक्षकच करत असतात.शिक्षकच देशाचे भवितव्य घडवित असतो. आणि म्हणून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.' असे प्रतिपादन पूणे विभाग शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.
चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न.भू. पाटील ज्युनि. कॉलेज येथील अटल टिंकरींग लॅब उद्घाटन व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जयंत आसगावकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड.एस.आर. पाटील हाते.
प्रास्ताविक प्राचार्य आर.आय. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय टी. टी. बेर्डे यांनी करून दिला. 'पवित्र अशा शिक्षण क्षेत्रातून भ्रष्टाचार हद्दपार झाल्याशिवाय शिक्षण क्षेत्राला अच्छे दिन येणार नाहीत '. असे मत विद्याधर गुरबे यांनी मांडले. ग्रामीण भागातील शाळांना भौतिक आणि शैक्षणिक सुविधा दिल्या तर शैक्षणिक क्रांती घडेल ,असे मत प्राचार्य डॉ.पी.आर. पाटील यांनी मांडले. संभाजी देसाई शिरोलीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२१ अंतर्गत पूणे शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्फत तालुक्यातील पहिल्या टप्यात अकरा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी सुमन सुभेदार, प्रा.आर.पी. पाटील, एस.व्ही. गुरबे, प्रा.एन.एस. पाटील, एम.एम. तुपारे, जे.बी. पाटील , एल.डी. कांबळे, एम.एम. गावडे, वाय. व्ही. कांबळे, अँड. संतोष मळवीकर, राजेंद्र परीट उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले तर आभार बी.आर.चिगरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment