सर्पोद्यानाला जागा मिळावी हिच बाबूराव टक्केकर यांना श्रध्दांजली ठरेल, मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना, ढोलगरवाडी येथे सर्पमित्र टक्केकर यांना अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2021

सर्पोद्यानाला जागा मिळावी हिच बाबूराव टक्केकर यांना श्रध्दांजली ठरेल, मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना, ढोलगरवाडी येथे सर्पमित्र टक्केकर यांना अभिवादन

ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे सर्पमित्र कै. टक्केकर यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहताना मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी शिक्षण मंडळाचे संस्थापक सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांच्या  ५ वा स्मृतिदिनी सत्यशोधक, वाघमारे सट्टूपा टक्केकर जुनियर कॉलेज व मामासाहेब लाड विद्यालयात संपन्न झाला. प्रारंभी कै. बाबुराव टक्केकर यांच्या स्मृती स्थळाला मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण करून आदरांजली वाहिली. अध्यक्षस्थानी सेवा संस्थाध्यक्ष  झी. नी. पाटील  होते. 

सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर

          त्यावेळी टक्केकर सरांनी निर्माण केलेल्या सोलापूर सर्पमित्रांकडून टक्केकर सरांच्या प्रेमापोटी शाळेला भेट म्हणून टक्केकर सरांच्या प्रतिमेचे अनावरण सरपंच सौ. सरिता तुपारे यांच्या हस्ते झाले. यावेळी सोलापूर व जयसिंगपूर  होऊन आलेल्या सर्पमित्रांनी साप पकडण्याची आधुनिक किट (स्ट्रीक, बॅग) भेट दिली. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, हलकर्णी कॉलेजचे प्राचार्य पी. ए. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डाॅ. नितीन चौगुले, उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, ॲड. संतोष मळवीकर, विद्या चौगुले-पाटील, माजी मुख्याध्यापक एन. एन. पाटील, एस एस कोकितकर, डाॅ. नंदकुमार गावडे, सोलापूरचे सर्पमित्र राहुल शिंदे, सेवानिवृत्त पीएसआय विजय ओऊळकर, प्रकाश यशवंत टक्केकर, एस. डी. पाटील, माजी मुख्याध्यापक जी. जी. वाके, प्रकाश बाबुराव टक्केकर, ज्योती तुकाराम गुरव उपस्थित होते. यावेळी कै. टक्केकर यांच्या  अंधश्रद्धा निर्मूलन, शैक्षणिक, सामाजिक व  राजकीय कार्याचा उजाळा उपस्थित मान्यवरांनी दिला.

     यावेळी लिंगनूरचे जयसिंग देसाई, सरपंच सुधीर गिरी, सुनीता गावडे, माजी मुख्याध्यापक कुट्रे, धानबा कदम,  ढोलगरवाडी चे उपसरपंच बाबुराव तुपारे, ग्रा. प. सदस्या सौ. सुष्मिता संजय पाटील, शोभा विलास कांबळे, माजी सरपंच गणपत कणगुटकर, प्रा. राम प्रधान, प्रा.बळे, गोव्याचे राजाराम पाटील, मनोहर पाटील प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे, शिवाजी तुपट, रघुनाथ नाईक (आसगाव), अक्षय कलखांबकर शिरगाव, मल्लू गावडे, बी. टी. पाटील, संतोष सुभेदार, गणपत ओऊळकर, इंद्रकुमार टक्केकर, वैजनाथ कांबळे,  मारुती बुवा -गिरी तसेच सोलापूर व जयसिंगपूर सर्पमित्र ग्रुप तसेच आमच्या सर्पोद्यान साठी सोलापूर व जयसिंगपूर  होऊन आलेल्या सर्पमित्रांनी साप पकडण्याची आधुनिक किट (स्ट्रीक, बॅग) भेट दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन  प्राचार्य एन. जी. यळूरकर व श्रीमती शांता बाबुराव टक्केकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. जी. पाटील यांनी तर आभार सौ. हर्षा शंकर कागणकर यांनी मानले.

           सर्पोद्यानाला जागा मिळावी हिच कै.टक्केकर याना श्रध्दांजली ठरेल सर्पमित्र कै. बाबूराव टक्केकर यानी जगावेगळी सर्पशाळा उभी केली. ही सर्पशाळा तालुक्याचे पर्यटन स्थळ व संशोधन केंद्र निर्माण व्हावे. यासाठी संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. त्याला यश मिळाल्यास हीच खरी आदरांजली ठरेल असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. वेळप्रसंगी मदत करण्याची ग्वाही दिली. सुदैवाने या प्रयत्नाला चंदगड तालुक्यातील सर्व जनतेचा संपूर्ण  पाठिंबा आहे. शासनाने लवकरात लवकर सर्पोद्यानसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment