न्हावेली येथे गोवा बनावटीची दारू जप्त,आरोपी फरार, १ लाख ३० हजारांचा मद्यसाठा जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2021

न्हावेली येथे गोवा बनावटीची दारू जप्त,आरोपी फरार, १ लाख ३० हजारांचा मद्यसाठा जप्त

न्हावेली (ता. चंदगड) येथे जप्त केलेल्या गोवा बनावटीच्या दारुसह चंदगड पोलिसांची टीम.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         न्हावेली (ता. चंदगड) येथे गोवा बनावटीच्या बेकायदा दारु साठ्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकून एकूण १ लाख ३० हजार ५९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी न्हावेली येथील आरोपी संतोष महादेव गावडे (पाटील) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          न्हावेली येथे घराच्या मागील बाजूस असलेल्या जनावारांच्या गोठ्यात हा दारूसाठा करून ठेवला होता. दरम्यान, या छाप्यावेळी आरोपी पळून गेला असून गोवा येथील हा दारुसाठी आणण्यासाठी वापरण्यात आलेली आरोपीची झायलो गाडी  ताब्यात घेण्यात आली आहे. संतोष पाटील याने स्वतःच्या फायद्याकरीता बेकायदा बिगर परवाना बेकायदा गोवा बनावटीचा वेगवेगळ्या कंपनीच्या १ लाख ३० हजार ५१२ रुपये किंमतीचा दारुसाठी महाराष्ट्र राज्याचा कर चुकवुन आपल्या झायलो गाडीतुन गोवा येथुन आणला होता. तो आपल्या घाराच्या मागिल बाजूला असलेल्या जनावरांच्या गोठ्यात साठा करुन ठेवला होता. याबाबतची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी छापा टाकून हा सर्व मद्यसाठी जप्त केला आहे. दरम्यान, आरोपी  पळून गेल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे. तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत चंदगड पो. कॉ. युवराज पाटील यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहा. फौजदार हणमंत नाईक करत आहेत.

No comments:

Post a Comment