चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात संविधान दिन व मतदार जागृती अभियान संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2021

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात संविधान दिन व मतदार जागृती अभियान संपन्न

चंदगड येथील  माडखोलकर महाविद्यालयात संविधान दिन व मतदार जागृती अभियान प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यी व प्राध्यापक वर्ग.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर हा संविधान दिन संपन्न झाला. प्रारंभी देशासाठी शहीद झालेल्या व कोरोना महामारीत प्राण गमावलेल्या व्यक्तीनां श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सर्व उपस्थिततांनी संविधानाची शपथ घेतली.  

          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  NSS  स्वयंसेवकांनी महापूरात आपत्तीग्रस्तांसाठी केलेली मदत व कोरोना योद्धे म्हणून केलेल्या कार्याचा आढावा प्रकल्प अधिकारी व कोल्हापुर जिल्हा समन्वयक प्रा. संजय पाटील यांनी घेतला. पाहुण्यांचा परिचय डाॅ. एन. के. पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ड. एन.एन. गावडे व ड. रवी रेडेकर हे लाभले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून संविधान दिनाचे महत्व, घटनेचे महात्म्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांची ओळख करून दिली. स्वकर्तृत्वातून समाजाची मदत करा, समाज विघातक कृतिना आळा घाला व विधायक कार्याची कास धरा असा सूचक सल्ला दिला. Not me but you हे एन. एस. एस. चे ब्रीद सार्थ ठरवा व देशाचे आदर्श नागरिक बना. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चतुःसुत्रिचा विसर पडू देऊ नका. तरच संविधान दिन सार्थकी ठरेल अशी आशा व्यक्त केली.   

          अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी स्वयंसेवक व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचे कौतुक करून आजी-माजी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. यापुढेही महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यात आपण नेहमी  सहभाग घ्यावा. आपले कार्य आदर्शवत व उत्तम अहेच, ते यापुढेही असेच सुरु ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

         आजादी का अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मतदार जनजागृती अभियान ही यशस्वीपणे राबविले जात आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थी व नागरिकांचे नोंदनी व प्रबोधनाचे कार्य सुरूच आहे.

             मान्यवरांच्या हस्ते एन. एस. एस. ची दोन वर्ष पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कोरोना योद्ध्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. एस. डी. गावडे, डाॅ. एन. एस. मासाळ, डाॅ आर. ए. कमलाकर, प्रा. एम. एस. दिवटे, प्रा. आर. एस. पाटील, डाॅ ए. वाय. जाधव, डाॅ. ए. ए. माने, प्रा. एल. एन. गायकवाड, पी. जी. कांबळे, प्रा. सचिन पाटील महाविद्यालयाचा सर्व स्टाफ आजी-माजी स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार प्रा. व्हि. के. गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment