ढोलगरवाडी येथे सर्पमित्र बाबूराव टक्केकर याना अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2021

ढोलगरवाडी येथे सर्पमित्र बाबूराव टक्केकर याना अभिवादन

 


चंदगड/प्रतिनिधी

          ढोलगरवाडी (ता. चंदगड) शेतकरी शिक्षण मंडळाचे संस्थापक कै. बाबूराव टक्केकर  यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमत्त (दि. २५ नोव्हेंबर रोजी) आदरांजली वाहण्यात आली. ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाङ विद्यालयाच्या  पटंगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक  झि.नि. पाटील होते. सर्पमित्र बाबूराव टक्केकर यानी  शैक्षणिक विकासाबरोबर सापांच्याबद्दल गैरसमज दूर करण्याचे काम केले. चंदगड तालुक्यामध्ये, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जठा निर्मुलनचे काम  त्यांचबरोबर वृक्षलागवडीचे काम यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. सत्यशोधक चळवळ तालुक्यात रुजवली.त्यामुळे त्यांचा स्मृतिदिन 'अंधश्रद्धा निर्मूलन दिन' म्हणून साजरा करण्यात आला. प्रारंभी कै.टक्केकर स्मृतीस्थळी  मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कै.टक्केकर यांच्या  कार्याचे स्मरण करण्यात आले.संस्थेचे सचिव आर.व्ही. पाटील, जेष्ठ संचालक मारुती रामा पाटील, एम. एम. कुट्रे, टी.एस.सुतार,व्ही. जे. पाटील, सरपंच  सौ. सरीता तुपारे,गणपत कनगुटकर  सर्पमित्र राहूल शिंदे (सोलापूर)आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन सदाशिव पाटील यांनी केले.No comments:

Post a Comment