डॉ. परशराम शिरगे यांची महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे फेलो म्हणून निवड, अमेरिकेच्या स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीचे जागतिक पातळीवर नामांकन - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2021

डॉ. परशराम शिरगे यांची महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे फेलो म्हणून निवड, अमेरिकेच्या स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीचे जागतिक पातळीवर नामांकन

डॉ. परशराम शिरगे


कागणी / सी. एल. न्यूज वृत्तसेवा 

           महाराष्ट्र राज्याच्या वैज्ञानिक क्षेत्रातील आघाडीची संस्था महाराष्ट्र विज्ञान अकादमीने (एमएएससी) यावर्षी कामेवाडी (ता. चंदगड) या गावचे सुपुत्र व आयआयटी इंदोरचे प्रा. डॉ. परशराम शिरगे यांची फेलो म्हणून निवड केली आहे. त्यांच्या निवडीने कामेवाडी तसेच चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

          त्यांनी केलेल्या आर्थिक सुवाहक पदार्थांचे संशोधन, बॅटरी, सुपरकपॅसिटर (अतिधारित्र), सौर ऊर्जा यंत्र इत्यादी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 14 विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी पूर्ण केली आहे. त्यांनी दोनशेहून अधिक शोधनिबंध जागतिक पातळीवर प्रकाशित केले आहेत. त्यांना गेल्या वर्षी मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (एमआरएसआय) ने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. हा भारतातील अग्रेसर पुरस्कार आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ. परशराम शिरगे  यांचे नाव स्टेनफोर्ड विद्यापीठाच्या वतीने जाहीर केलेल्या यादीत नामांकन मिळाले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या वतीने जगभरातील संशोधनात आघाडीवर असलेल्या पहिल्या दोन टक्के लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. शिरगे यांना नामांकन मिळाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांना हे नामांकन मिळाले आहे. त्यांना यापूर्वी रामानुजन फेलोशिप (भारत सरकार), आयएसपीएस फेलोशिप जपान, एमके - 21 फेलोशिप (साऊथ कोरिया) हे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

No comments:

Post a Comment