अडकूर परिससरातील शाळामध्ये कांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती विविध उपक्रमानी साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2022

अडकूर परिससरातील शाळामध्ये कांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती विविध उपक्रमानी साजरी

सातवणे येथे पारंपारिक वेशभूषेत आलेल्या मुली.

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

          भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १९० वी जयंती अडकूर परिसरातील शाळामध्ये वेगवेगळ्या उपक्रमानी साजरी करण्यात आली.

         येथील श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी, आरोग्य सेविका संपदा नाईक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातवणे येथील श्री चाळोबा माध्यमिक विद्यालयात प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक डी. एल. पाटील यांनी केले. त्याचबरोबर केंद्रशाळा अडकूर, विद्या मंदिर उत्साळी, मलगेवाडी, मोरेवाडी, विंझणे, अलबादेवी, बोजूर्डी, गणूचीवाडी आदी सर्व शाळामध्ये सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मूली पारंपारिक वेषभूषा करून सावित्रीबाईची भूमिका वटवली. अनेक ठिकाणी भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. एकंदरित अडकूर परिसरातील सर्व शाळामध्ये सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

No comments:

Post a Comment