अडकूर येथील शिवशक्ती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याना कोविड प्रतिबंधक लसिकरण करताना संपदा नाईक |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आज शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या १५० विद्यार्थ्याना कोविड लसिकरण करण्यात आले.
संपूर्ण देशात आज दि. ३ जानेवारीपासून वय वर्षे १५ ते१८ वर्षे असणाऱ्या विद्यार्थ्याना कोवॅक्सीन लसीकरण करण्यात आले. आज पाहिल्याच दिवशी या लसिकरणाचा लाभ अडकूर मधील या १५० विद्यार्थ्याना देण्यात आला. यासाठी अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सोमजाळ, प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले. तर लसिकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेविका सौ. संपदा नाईक, डाटा ऑपरेटर प्रगती निंबाळकर, एमपीडब्लू स्वप्नील सुतकट्टीकर, आशा सेविका रमिजा मुल्ला, सुनिता घोरपडे, जुबेदा मकानदार यानी प्रयत्न केले.
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. बालिकांचा सन्मान करण्याचा दिवस. याच दिवसी कोरोणा प्रतिंबंधक कोवॅक्सिन लस आम्हाला देण्यात आल्याने खूपच आनंद झाला. लस घेताना जराही भिती वाटली नाही. आता लस घेतल्याने आत्मविश्वास वाढला असून बोर्ड परिक्षेची तयारी करताना मनावरचे कोरोनाचे खूप मोठे दडपण कमी झाल्याचे इयत्ता दहावीतील तनुजा पाटील हिने सांगितले.
यावेळी एस. के. पाटील, बंकट दिशेबकर, आय. वाय. गावडे, एस. एन. पाटील, पी. के. पाटील प्रा. रामदास बिर्जे, प्रा. एम. पी. पाटील आदि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment