कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयाच्या बीएबीएड विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेहमेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2022

कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयाच्या बीएबीएड विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेहमेळावा

महावीर महाविद्यालय कोल्हापूर


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
      महावीर महाविद्यालय कोल्हापूरच्या बीएबीएड विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवार दि २० जानेवारी रोजी सकाळी  १० वाजता स्नेहमेळावा आयोजित केला असल्याची माहिती बीएबीएड विभागाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. विनोद 
कांबळे यानी दिली.
        या मेळाव्यामध्ये व्यवसाय, नोकरी तसेच मुलाखतीला जाण्याअगोदरची पूर्वतयारी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात विशेष  यश संपादन केलेल्या  माजी विद्यार्थी, प्राध्यापक यांचा सत्कार, सेवानिवृत्त माजी समन्वयक डॉ. मलगोंडा  मायगोंडा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याबरोबरच जयवंत आवटे यांचे विनोदी कथाकथन होणार आहे. तरी महाविद्यालय बीएबीएड विभागाच्या माजी विद्यार्थ्यानी मेळाव्याला कोरोणा नियमांचे पालन करत उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य आर. पी. लोखंडे, समन्वयक डॉ. सुजाता पंडित, माजी विद्यार्थी प्रमुख  प्रा. डॉ. गोपाळ गावडे  व पियांका पाटील यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment