माणगांव विभागाच्या विकासासाठी भरीव निधी देणार - आमदार राजेश पाटील, विविध विकास कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2022

माणगांव विभागाच्या विकासासाठी भरीव निधी देणार - आमदार राजेश पाटील, विविध विकास कामांचा शुभारंभ

माणगाव येथे विकास कामांचा शुभारंभ करताना आमदार राजेश पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           विधानसभा निवडणूकीत माणगाव विभागाने मला भरभरून मते दिली. त्यामुळे माझा माझा विजय सोपा झाला. ज्या समाजाने मला मोठे केले त्या समाजाला काहीतरी देण ही माझी नैतिक जबाबदारी आहे. म्हणूनच मतदार संघाबरोबरच माणगांव विभागाला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे विचार आमदार राजेश पाटील यानी व्यक्त केले. माणगांव (ता. चंदगड) येथे ७० लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी आमदार राजेश पाटील बोलत होते.

      कोरोणा काळात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघात ऑक्सीजन  प्लॉट उभे केले.  पाटणे फाटा येथे ४२ कोटींची तरतूद करून ४ एकर जागेवर हॉस्पीटल उभारण्यात येणार आहे. राजकीय मतभेद असतील पण विकास कामात एकत्र येण्याचे आवाहन आमदार राजेश पाटील यानी यावेळी  बोलताना केले.

         यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते माणगांव, माणगांववाडी, मलगड, हूंबरवाडी, लाकूरवाडी येथील विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा केला. या कार्यक्रमाला माणगावच्या सरपंच सौ. अश्वीनी कांबळे, अनिल सुरूतकर, शामराव बेनके, विश्वनाथ वाघराळे, प्रकाश पाटील, शिवाजी होणगेकर,  माजी पं. स. सभापती बंडू चिगरे, विठ्ठल पिटूक, संजय गावडे , सदस्या पार्वती चिंचणगी, सुनिता कांबळे, बाबू दुकळे-उपसरपंच, भारती गावडे, अनिल शिवनगेकर, लक्ष्मण ससेमारी,  डॉ. विलास पाटील, डॉ. संजय पाटील, यमाजी गावडे, सौ. सुनिता चिगरे, नामदेव बेनके, प्रकाश चिगरे, विकास पाटील यांच्यासह माणगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment