संख्याज्ञान व साक्षरता या विषयावरील तालुकास्तरीय स्त्रोत गटाची बैठक संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2022

संख्याज्ञान व साक्षरता या विषयावरील तालुकास्तरीय स्त्रोत गटाची बैठक संपन्न

चंदगड येथील निपून भारत बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग गटसाधन केंद्र चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड गटाची  न्यु इंग्लिश स्कुल चंदगड येथे निपुण भारत अंतर्गत मुलभुत संख्याज्ञान व साक्षरता या विषयावर तालुकास्तरीय स्त्रोत गटाची बैठक पार पडली. 

          तालुक्यातील १९ केंद्रातील प्रत्येकी -३ शिक्षक, केंद्रप्रमुख - २ मुख्याध्यापक -४, SMC सदस्य -४, NGO - २, विषय साधनव्यक्ती , विशेष साधनव्यक्ती, विशेष शिक्षक असे  एकुण ७२ सदस्यांनी सहभाग नोंदविला. या बैठकीमध्ये उपस्थितांचे स्वागत व सुत्रसंचलन  सुनिल पाटील, गटसाधन केंद्र चंदगड यांनी केले. प्रास्ताविक व मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी सौ. एस . एस. सुभेदार यांनी केले. 

जेष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरच्या सौ. वैशाली पाटील, प्र. केंद्रप्रमुख डी. टी. कांबळे, वि. म. हजगोळीचे मोहन सुतार यांनी निपुण भारत अंतर्गत मुलभुत संख्याज्ञान व साक्षरता या विषयावर मार्गदर्शन केले. स्त्रोत गटाचे सचिव शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी आढावा व मार्गदर्शन केले. सदर बैठकीत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधनव्यक्ती, विशेष साधनव्यक्ती विशेष शिक्षक, SMC अध्यक्ष, सदस्य, NGO यांनी सहभाग नोंदविला. केंद्रस्तरावर, शाळास्तराव स्त्रोत गट बैठका घेणेबाबतच्या प्रशासकिय सुचना देणेत आल्या. विषय साधनव्यक्ती महादेव नाईक यांनी तांत्रिक बाबींची पुर्तता केली. चंदगड गटसाधन केंद्राचे भाऊ देसाई यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment