नेहरू युवा केंद्र कोल्हापूरच्या वतीने कोरज, कुर्तनवाडी व गंधर्वगड ग्रामस्थांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2022

नेहरू युवा केंद्र कोल्हापूरच्या वतीने कोरज, कुर्तनवाडी व गंधर्वगड ग्रामस्थांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन

नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर मार्फत चंदगड येथील कोरज, कुर्तनवाडी, गंधर्वगड ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहीती देताना.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर (युवा व क्रिडा मंत्रालय, भारत सरकार) मार्फत चंदगड येथील कोरज, कुर्तनवाडी, गंधर्वगड येथे वैयक्तिक संपर्क आणि सुविधा कार्यक्रम राबविण्यात आला. नेहरु युवा केंद्र चंदगड स्वयंसेवक अमेय विलास सबनीस यांनी केंद्र शासनाच्या योजना गावकऱ्यांना समजावून सांगितल्या.

         यामध्ये पंतप्रधान आवास योजना, छोट्या व्यवसायासाठी भांडवल कर्ज, फळ भाजीपाला विक्रेत्यांनसाठी कर्ज, शेतीविषयक योजनांची माहिती इत्यादी योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. ग्रामस्थांनी देखिल उत्कृष्ट सहभाग नोंदविला. असे कार्यक्रम नेहरू युवा केंद्रामार्फत वारंवार राबविण्यात यावेत आणि ग्रामीण भागात देखील योजनांची माहिती मिळावी अशी जनभावना लोकांमध्ये होती. योजनांची माहिती दिल्याबद्दल ग्रामस्थांनी नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक अमेय विलास सबनीस यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment