चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल बाळकृष्ण मुतकेकर यांचा सत्कार करताना मान्यवर
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
जिज्ञासा प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्था मर्यादित कोवाड. (ता. चंदगड) जि. कोल्हापूर या संस्थेची सन-२०२२ते२७ या सालाकरिता संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी बाळकृष्ण गोविंद मुतकेकर यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे, बाळकृष्ण गोविंद मुतकेकर (चेअरमन), धोंडीबा दत्तू कुट्रे (व्हा. चेअरमन), कविता विष्णू पाटील, शुभांगी महादेव नाईक, संजय दत्तात्रय पाटील, अशोक दिनकर भोईटे, आपाजी नामदेव रेडेकर, राजू महादेव डोणकरी, सुनिल मारूती कुंभार, अशोक इरापा पाटील. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी के. आर. कोळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment