चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील अंगणवाडी सेविका सौ. अर्चना अरूण गुडंप याना कोल्हापूर जि. प. च्या महिला बालकल्याण विभागामार्फत २०२१-२२ चा आदर्श मिनी अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते शाहू सभागृहात सौ. अर्चना गुडंप यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
सन २०२०-२१ सालात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख ७०००रू असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, महिला व बालकल्याण सभापती सौ. शिवानी भोसले, समाजकल्याण सभापती सौ. कोमल मिसाळ, शिक्षण व अर्थ सभापती रसिका पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती वंदना जाधव, प्रकल्प अधिकारी शिल्पा पाटील यासह जि. प. सदस्या रेखा हत्तरकी, वंदना पाटील, आकांक्षा पाटील, कल्पना चौगुले, पद्मारानी पाटील, वंदना पाटील, आक्काताई नलवडे, सुनिता रेडेकर, प्रकल्प अधिकारी सौ. वत्सला पाटील आदी सदस्या उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment