रयत सेवा फौंडेशनकडून अपघातग्रस्त अशोकला मदत देताना पदाधिकारी. |
दाटे : सी. एल. वृत्तसेवा
दाटे (ता. चंदगड) येथील अशोक तेरणीकर याचा शिरगाव जवळ गंभीर अपघात झाला.त्याच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्याच्या पायाच्या दोन शस्त्रक्रिया होणार आहेत. ही खर्चिक गोष्ट आहे. त्याला मदत करण्यासाठी दाटे येथील रयत सेवा फाउंडेशनचे मार्गदर्शक व मंत्रालयीन अधिकारी घनश्याम पाऊसकर यांच्या पुढाकाराने रू. 21600/- इतकी मदत जमा करण्यात येऊन ती अशोकच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
दरवर्षी पावसाळ्यात अशोकचे झोपडी वजा घर पुरात सापडते. त्यावेळी तो पावसाळ्याचे काही दिवस शाळेतच मुक्काम करतो. अशोकला दोन लहान मुली आहेत. आधार कार्ड लिक कराण्या साठी चंदगडला जात असताना अशोकचा अपघात झाला. रयत सेवा फाउंडेशनकडून अशोकला मदतीसाठी सोशल मिडीयावर सुद्धा आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी रयत सेवा फौडेशनचे ज्ञानेश्वर गावडे, मारुती किदळेकर, ऋषिकेश सातर्डेकर, रवि गुरव, शंकर साबळे, गुंडू तेरणीकर, अनिल व्हडावडेकर, संजय कांबळे, सुबराव तेरणीकर, संजय साबळे उपस्थित होते. अशोकला अधिकाधिक मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींना रयत सेवा फाउंडेशन कडून विनंती करण्यात येते की, त्यांनी खालील बँक खात्यावर आपली मदत जमा करावी.
Ashvini Ashok Teranikar
Bank of India, Chandgad Branch
A/C No. 091218210014161
IFSC Code - BKID0000912
Google pay/Phone pe No. 9130491872
No comments:
Post a Comment