पुस्तकांच्या गुढी सोबत प्रा .रविंद्र पाटील
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
गुढी पुस्तकांची गुढी विचारांची या संकल्पनेअंतर्गत आज प्रा. रविंद्र पाटील हुंदळेवाडी ( ता. चंदगड ) यांच्या घरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला . यावेळी पुस्तकांची गुढी उभा करून वाचन संस्कृती, वाचनाचे महत्त्व, व्हाट्स अॅप व इंटरनेटच्या विळख्यात अडकलेली तरुणाई, तरूणांमध्ये मोबाईल मुळे निर्माण झालेले एकटेपण , दिवसेंदिवस कमी होत चाललेला संवाद , त्यामुळे तरुण पिढीमध्ये आलेले नैराश्य , या बाबींवर प्रकाश टाकण्याला हेतूने व वाचन संस्कृतीची जपणूक व्हावी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून समाजजागृती व्हावी म्हणून पुस्तकरूपी गुढीचे पूजन करण्यात आले .
तरुण पिढीने पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे. वाचनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. भविष्यातील भारताचे स्वप्न पाहत असताना शिक्षण व ज्ञान या गोष्टींना खूप महत्त्व असणार आहे यासाठी प्रत्येकाने पुस्तकांशी घट्ट मैत्री करावी ,वाचन वाढवावे आपल्या घरातील भावी पिढीला अभ्यासाची , शिक्षणाची आवड निर्माण करावी हा हेतू ठेऊन आजच्या पुस्तकी रूपी गुढीचे पुजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment