विक्रीसाठी बाजारात दाखल झालेल्या नागाच्या रंगीबेरंगी आकर्षक मूर्ती |
बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा
नागपंचमी दोन दिवसावर आली असून नागाच्या रंगीबेरंगी आकर्षक मूर्ती विक्रीसाठी बेळगाव बाजारात दाखल झाल्या आहेत.
दरवर्षी नागपंचमी पासून मुर्तिकरांचा सिझन सुरू होतो. बहुतेक जणांच्या घरी नाग पूजण्याची परंपरा आहे. दोन दिवस अगोदरच बाजारात नागाच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. पाच फणे असलेले आणि एक फणा असलेले आकर्षक रंगातील नागाच्या मूर्ती बाजारपेठेत लक्ष वेधून घेत आहेत. नागाच्या मूर्ती वीस रू पासून शंभर रू. पर्यंत उपलब्ध आहेत. गेली दोन वर्षे नागपंचमी देखील कोरोना मुळे साधेपणाने साजरी करावी लागली होती. पण यावर्षी निर्बंध नसल्याने जनतेत उत्साही वातावरण आहे. तंबीट ( लाडू) तयार करण्यासाठी चिकट गुळाला मागणी अधिक आहे. याशिवाय पोहे, फुटाणे, शेंगा, लाह्या यांना देखील मागणी वाढली आहे.
No comments:
Post a Comment