पत्रकार विजयकुमार दळवी यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2022

पत्रकार विजयकुमार दळवी यांना पितृशोक

 

डॉ. रामचंद्र लक्ष्मण दळवी

चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा
        नागनवाडी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक डॉ. रामचंद्र लक्ष्मण दळवी (वय.८४) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सकाळी सहा वाजता निधन झाले.
      कोरोनाची पहिली लस एप्रिल २०२१ मध्ये घेतल्यानंतर मेंदूत रक्तस्त्राव होऊन ते आजारी होते. दुचाकी मोटरसायकल चालवून घरी परतलेल्या डॉ. रामचंद्र दळवी यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आणि त्यांचे डोळे अचानक बंद पडले. गेल्या तीन महिन्यापासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली. बेळगावच्या केएलई रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
       चंदगड तालुक्यातील नागणवाडी येथे त्यांनी 1967 साली दवाखाना सुरू केला. ते मूळचे मंडोळी गावचे होते. कानूर अडकुरसह तालुक्याच्या पश्चिम भागातील गावागावातून जावा गाडीवरून फिरून त्यांनी रुग्ण सेवा केली.पाठदुखी, कंबरदुखी,मान  विळखण्यावरील उपचारासाठी ते विशेष होते परिचित होते. गोरगरीब रुग्णांची सेवा करताना त्यांनी कधीही आर्थिक गणित सांभाळले नाही. जेवढे गरीब तेवढे त्यांच्याकडे उपचारासाठी येत होते. गेल्या पाच तपातील गरिबांचा डॉक्टर म्हणून परिचित असलेल्या  डॉक्टर रामचंद्र दळवी  यांच्या निधनाने पंचक्रोशीत अवकळा पसरली आहे.            त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे,दोन भाऊ, चार बहिणी, असा  परिवार आहे. दैनिक तरुण भारतचे चंदगड तालुका प्रतिनिधी विजयकुमार दळवी आणि नागनवाडी येथील डॉक्टर अजयकुमार यांचे ते वडील होत.चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेली पाच तप त्यानी वैद्यकीय सेवा बजावली होती.No comments:

Post a Comment