विलास अध्यापक |
बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विलास अध्यापक यांची निवड एकमताने करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी महेश काशीद, कार्यवाह म्हणून शेखर पाटील, सहकार्यवाह म्हणून गुरूनाथ भादवणकर व सुहास हुद्दार यांची परिषद प्रतिनिधी म्हणून फेरनिवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत 2022-23 सालासाठी नूतन पदाधिकार्यांची ही निवड झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृष्णा शहापूरकर होते. पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यावर सदानंद सामंत, राजेंद्र पोवार यांची यावेळी नूतन पदाधिकार्यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली. तसेच प्रकाश माने यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कार्यकारिणी सदस्यपदी परशराम पालकर यांची नियुक्ती करण्यात आली.
No comments:
Post a Comment