चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील अनेक कामगार पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात काम करत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या काळात त्यांना अनेक संकाटांना तोंड द्यावे लागते. तसेच पुन्हा कामावर रुजु होतानाही अनेकासमोर समस्यांचा डोंगर उभा होता. कामावर असतानाही त्यांच्यावर अनेकदा अन्याय होता. हे कामगार सर्व सोयी-सुविधापासून वंचित आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना स्थापन करणार आहे. यासाठी गेल्या दोन वर्षात हॉटेल कामगार ग्रूप तयार करून २ हजारपेक्षा अधिका कामागरांना एकत्र केले आहे. या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट भेटून गाऱ्हाणे मांडणार असल्याचे प्रसिध्दीपत्रक सामाजिक कार्यकर्ते अनिल पेडणेकर यांनी प्रसिध्दीला दिले आहे.
अनिल पेडणेकर यांनी कोरोनाच्या काळात लोकांना दिलासा मिळावा म्हणुन अनेक वेळा ग्राम पंचायतीला निवेदन दिले आहे. उमगाव मधील जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर चालु करण्यासाठी आंदोलन केले. त्याचबरोबर त्याचा पाठपुरावा करून टॉवर चालु करुन लोकांच्या प्रवाहात आणले. राज्यकर्त्यांना भेटून हॉटेल कामगारांच्या मागण्या, विधान भवनापर्यंत पोहचवणे, आणि त्या मागण्या पूर्ण करून घेण्याचे ध्येय आहे.
यासाठी चंदगड तालुक्यातीलही हॉटेल कामगारांचा पाठींबा मिळत आहे. पुढील महिन्यात चंदगड येथे हॉटेल कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करुन मार्गदर्शन करणार असल्याचे श्री. पेडणेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment