किणी येथे मॅरेथॉन, रांगोळी व सामान्य ज्ञान स्पर्धा, गणेशोत्सव निमित्त आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2022

किणी येथे मॅरेथॉन, रांगोळी व सामान्य ज्ञान स्पर्धा, गणेशोत्सव निमित्त आयोजन


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  किणी, ता. चंदगड यांच्यावतीने गणेशोत्सव निमित्त खुल्या मॅरेथॉन, रांगोळी व सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता ५ किलोमीटर खुल्या पुरुष मॅरेथॉन स्पर्धा होणार असून यासाठी रोख रुपये- २५०१, २००१, १५०१, १००१, ७५१ व ५०१ तसेच मानचिन्ह अशी बक्षीसे आहेत.
 मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता खुल्या रांगोळी स्पर्धा होणार आहेत. यासाठी रोख बक्षिसे रुपये- २५०१, २००१, १५०१, १००१, ७५१ व ५५१ तसेच मानचिन्ह अशी बक्षिसे आहे. 
  बुधवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता इयत्ता सातवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रोख रुपये- २००१, १५०१, १००१, ७५१, ५०१ व ३५१ तसेच मानचिन्ह अशी भरघोस बक्षीसे ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक स्पर्धेसाठी २०/- रुपये प्रवेश शुल्क असेल. इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेपूर्वी दोन दिवस आधी मंडळाकडे आपले नाव नोंदवणे बंधनकारक आहे. तालुक्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजय कुट्रे, सुनील मनवाडकर, संभाजी हुंदळेवाडकर, विनायक बिर्जे, अनिल हुंदळेवाडकर, आदींनी मंडळाच्या वतीने केले आहे.

No comments:

Post a Comment