गडहिंग्लज/खास प्रतिनिधी :--
हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी डाॅ प्रकाश शहापूरकर गटाच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.काल गडहिंग्लज येथे डाॅ.शहापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली गडहिंग्लज कारखाना बचाव पॅनेलच्या इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्याची बैठक झाली.
गडहिंग्लज येथील कारखान्याची निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन वादात अडकली असली तरी काही दिवसातच निकाल लागण्याची शक्यता आहे.त्यामुळेच डाॅ. शहापूरकर गटाने आपली तयारी सुरू केल्याचे दिसते.त्याचाच एक भाग म्हणून काल गडहिंग्लज येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यात आली."गडहिंग्लज कारखाना बचाव "या ऐकमेव हेतूने डाॅ. शहापूरकर गट ही निवडणूक लढवणार आहेत.त्यामुळेच शेतकरी, सभासदात प्रतिमा असलेल्यां कार्यकर्यानाच उमेदवार म्हणून संधी मिळणार असल्याचे समजते.काल झालेल्या बैठकीत डाॅ. प्रकाश शहापूरकर याना पॅनेल निवडीचे व युतीचे सर्वाधिकार देण्यात आले. डाॅ. प्रकाश शहापूरकर (कौलगे), आनंद कुलकर्णी (कडगाव), शिवराज पाटील (गडहिंग्लज),रवी पाटील (कडलगे),शिरीष हरळीकर (हरळी),भरमु जाधव (तावरेवाडी),बसवराज आरबोळी (तनवडी),निखील शिरकोळी (मुगळी),अरूण प्रभाकर गवळी (हेब्बाळ क।।नूल),गौतम कांबळे (हरळी),संजय बटकडलगी (कडगाव),प्रकाश गंगाराम पाटील (अत्याळ) आदी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली.तर अरूण गवळी ,गौतम कांबळे ,संजय बटकडलगी या तिघांची राखीव जागेवरील उमेेेेदवारी साठी नावे "फायनल" कल्याचे समजते.याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी रविवार दि. ११ सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथील मंत्री सभागृहात कार्यकर्त्यांचा जाहीर मळावा आयोजित करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment