निपाणी येथे सुभेदार मेजर चव्हाण यांचा सत्कार करताना मान्यवर. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
सर्व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे निपाणीचे सुपुत्र सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी भारतीय सेना दलातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कांगो गणराज्य येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने इंडियन आर्मी शांती सेनेच्या माध्यमातून कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यापासून भारतातून गेलेल्या सेवन मराठा लाईट इन्फंट्री बटालियन मधून सुभेदार मेजर गजानन चव्हाण सेवा बजावत आहेत.
गेल्या आठ-दहा महिन्यात कांगो येथील सर्वसामान्य नागरिकांना ज्वालामुखी, शेजारी देश व देशांतर्गत बंडखोरांच्या हल्ल्यापासून संरक्षण देण्याबरोबरच जखमी नागरिकांना पुरवलेल्या आरोग्य सुविधा आदी अतुलनीय कामगिरीसाठी भारतीय आर्मी ला संयुक्त राष्ट्र संघाने प्रशस्तीपत्र व पदक देऊन नुकतेच गौरवले होते. या कामगिरीमध्ये गजानन चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता. सध्या ते काही दिवसाच्या सुट्टीवर निपाणी येथे आपल्या घरी आलेले असताना त्यांच्या कष्टाचा सन्मान झाला पाहिजे, या हेतूने निपाणी व परिसरातील विविध संस्था, संघटना, मंडळे यांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. रोटरी हॉल निपाणी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्रा. डॉ. अच्युत माने यांनी सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचे यांच्या कार्यामुळे निपाणी विभागाचा जगभर गौरव झाला आहे. त्यांचे कार्य नवीन युवकांसाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक एन आय खोत, भाऊसाहेब जिनगे, राजेश बनवन, डॉ. राजेश शेडगे, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे, प्रणव मानवी, आदींनी मनोगते व्यक्त केली. सुभेदार मेजर चव्हाण यांनी आपल्या ३२ वर्षातील सेवा व शांती सेनेच्या माध्यमातून केलेली परदेशातील सेवा यामागे स्वातंत्र्यसैनिक वडिलांचा वारसा तसेच कुटुंबातील सदस्य व समाजातून मिळत असलेला पाठिंबा यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. यावेळी दीपक इंगवले, बाळासाहेब कळसकर, नगरसेविका अनिता पठाडे, अमर पाटील, निकु पाटील, प्रताप पट्टणशेट्टी, गजानन शिंदे, धनाजी भाटले, सुधाकर माने, प्रा. मधुकर पाटील, बसवराज जडी, मल्लाप्पा तावदारे, वसंत नगरे आदींची उपस्थिती होती. अमृता संकपाळ हिने सूत्रसंचालन केले. बाबासाहेब मगदूम यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment