आजऱ्यातील उत्तूर येथून चोरीस गेलेली चारचाकी सापडली, दोन संशयितासह १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2022

आजऱ्यातील उत्तूर येथून चोरीस गेलेली चारचाकी सापडली, दोन संशयितासह १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

चारचारी व इतर चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीसोबत गुन्हे अन्वेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           उत्तूर (ता. आजरा) येथून चोरीस गेलेल्या चारचाकीसह इतर दोन अशा एकूण तीन चारचाकी व या चारचाकींचा वापर करून अनेक ठिकाणी चोऱ्या कारणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांना यश आले. यामध्ये गाडयांसह चोरीतील १७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

         पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर कडील वेगवेगळी पथके तयार करुन माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. उत्तूर (ता. आजरा) येथून चोरलेली मारुती कंपनीची इको गाडी क्र. एमएच - ०९ एफक्यु ०३८५ ही घेवून दोन व्यक्ती कोल्हापूर कागल जाणाऱ्या हायवेवरील कणेरी फाट्यावर येणार असले बाबत माहिती मिळालेने पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस अमंलदार रणजित पाटील, प्रशांत कांबळे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रणजित कांबळे, विनोद कांबळे, आसिफ कलायगार व अनिल जाधव यांच्या तपास पथकाने कोल्हापूर ते कागल जाणारे एनएच-४ हायवेवरील कणेरी फाट्यावर सापळा लावून ईश्वरसिंह रणवीरसिंह राजपूत (वय 30, रा. घर नं. 176, जुनसवाडा , मार्केम , नॉर्थ गोवा मुळ गांव - जुनी बाली , ता . बागोडा , जि . जालोर , राज्य राजस्थान व 02) कृष्णकुमार राणाराम देवासी ( वय 27 , रा . करासवाडा , चार रास्ता , म्हापसा , गोवा मुळ गांव - हरटवाव , ता . गुड्डामालानी , जि . बाडमेर , राज्य राजस्थान ) यांना त्यांचे कब्जातील इको गाडी क्र . एमएच - 09 - एफक्यु 0385 सह सदर आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांसह मिळुन आजरा , गांधीनगर व करवीर पोलीस ठाणेचे हद्दीत घरफोडी , चोरी तसेच इको गाड्या चोरीचे गुन्हे केल्याची दिली. 

               त्यांच्या माहितीवरुन त्यांचे कब्जातील चोरलेली इको गाडी क्र . एमएच - 09 - एफक्यु- 0385 एक तसेच आणखी एक चोरीची इको गाडी व गुन्हे करणेकरीता वापरलेली एक इको गाडी अशा एकूण तीन इको गाड्या तसेच घरफोडी चोरीतील साहित्य असा एकूण 17,00,000 / - ( सतरा लाख ) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे मुळचे राजस्थान राज्यातील असून ते सध्या गोवा राज्यात राहणेस आहेत. ते गोवा येथुन त्यांचे मालकीचे चारचाकी इको गाडीतून रात्रीच्या वेळी कोल्हापूर येथे येवून चोऱ्या करुन परत जात असलेचे निष्पन झाले आहे. आरोपींचे कब्जात उत्तूर मधील चोरीस गेलेली इको गाडी क्र . एमएच - 09- एफक्यु 0385 ही मिळुन आलेने आरोपींना आजरा पोलीस ठाणे येथे हजर करणेची प्रक्रिया सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अप्पर पोलीस अधीक्षक , तिरूपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे व पथकाने केली.

No comments:

Post a Comment