जिल्हा बॅकेने दौलतच्या सभासदांच्या ठेवी व्याजासह परत कराव्यात, दौलत सभासद संघटनेचे बँकेला निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2022

जिल्हा बॅकेने दौलतच्या सभासदांच्या ठेवी व्याजासह परत कराव्यात, दौलत सभासद संघटनेचे बँकेला निवेदन

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व शेतकऱ्यांच्या ठेवी केडीसीसी बँकेने व्याजासह परत कराव्यात अशा मागणी दौलत सभासद संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन कोल्हापूर जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एल. बी. माने यांना दौलत सभासद संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजयभाई पाटील, प्रकाश कोल्हाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंदगड शहराध्यक्ष सतीश सबनीस, शेकापचे रवींद्र पाटील यांनी दिले आहे.

       ३ वर्षांपूर्वी कर्जापोटी केडीसीसी बँकेने दौलत कारखाना लीजवर अथर्व इंटरट्रेड कंपनीला चालवायला दिलेला आहे. तत्पूर्वी अनेक वर्षापासून दौलतला ऊस पुरवठा केलेल्या हजारो शेतकरी, सभासद यांची ऊस बिले ठेवी स्वरूपात दौलत कारखाना प्रशासन व संचालक मंडळाने ठेवून घेतलेली आहेत. ती व्याजासह दामदुप्पट ते तिप्पट करून शेतकऱ्यांना तसेच सभासदांना तात्काळ परत करावीत अशी मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष विजयभाई पाटील व शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एल. बी, माने यांच्याकडे या संदर्भात निवेदन सादर केले आहे.

No comments:

Post a Comment