दौलतच्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, अथर्व व्यवस्थापनाचे कर्मचारी वर्गाला कायदेशीर आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2022

दौलतच्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, अथर्व व्यवस्थापनाचे कर्मचारी वर्गाला कायदेशीर आवाहन

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
          हलकर्णी (ता. चंदगड) येथील  दौलतच्या कारखान्याकडील संपावर गेलेल्या सर्व कामगारानी कामावर हजर व्हावे असे कायदेशीर आवाहन अथर्व व्यवस्थापनाने केले.
        महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने माहे ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरु करणे बाबत साखर आयुक्तलयामार्फत नियमानुसार परवानगी देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने आपल्या कारखान्याची यंत्रसामुग्री दुरुस्ती देखभाल, आधुनिकीकरण व इतर अनुषंगिक कामे जलद गतीने सुरु करून कारखाना ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु सर्व कामगार हे दि. १९. ०८. २०२२ रोजीपासून बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे कारखान्याची यंत्रसामुग्री दुरुस्ती- देखभाल, आधुनिकीकरण व इतर कामे खोळंबली आहेत परिणामी कारखाना ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरु करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी केलेल्य बेकायदेशीर संपामुळे होणाऱ्या नुकसानीला पूर्णपणे संप करणारे कर्मचारी जबाबदार आहेत. तसेच केलेल्या बेमुदत संप हा बेकायदेशीर असल्यामुळे कारखाना व्यवस्थापणाने कामगार न्यायालय क्रं. १, कोल्हापूर यांचे कोर्टात बी. आय. आर. अर्ज नं १ / २०२२ दाखल केलेला आहे. सदरचे कामी अंतरिम अर्ज सुद्धा दाखल केलेला असून सदर अर्जावर न्यायालयाने दि. २३.०८.२०२२ रोजी अंतीम आदेश करून कारखान्याचे ५०० मीटरचे आवारात कोणतेही गैरकृत्ये करू नये, कामावर जाणाऱ्या कामगाराला आडवू नये किंवा घेराव सारखे कृत्य करू नये असे निर्देश दिले आहेत. सबब सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात येते की, संपकरी कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे. अन्यतः त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल. तसेच बेकायदेशीर संप कालावधीतील पगार' काम नाही म्हणून पगार नाही (NO WORK NO PAY)' या तत्वानुसार संपकरी कर्मचाऱ्यांना अदा केला जाणार नाही. तेंव्हा सर्व कामगारांना आवाहन करण्यात येते की, संपकरी कर्मचाऱ्यांनी दि. ०५.० ९ .२०२२ रोजी पासून कामावर हजर राहून कामकाज सुरु करावे. जे कामगार कामावर हजर राहणार नाहीत त्यांचेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करणेत येईल. याची सर्व कामगारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment