कागणी : एस. एल. तारिहाळकर
नोकरी निमित्त युगांडा (आफ्रिका खंड) येथे साखर कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कागणी तसेच होसूर (ता. चंदगड) येथील तरुणांकडून यंदा सलग तिसऱ्या वर्षी स्वतः गणेश मूर्ती निर्मिती करून गणेशोत्सव साजरा केला.
युगांडा : गणरायाच्या पूजन प्रसंगी सचिन पाटील, शिवाजी शहापूरकर, नारायण नाईक यांच्यासह स्थानिक नागरिक, महिला यांच्या सह अधिकारी व कर्मचारी. |
युगांडा देशातील कयुंगा जिल्ह्यामध्ये कसोके या गावात जी. एम. साखर कारखाना आहे. येथे कृषी तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे शिवाजी कलाप्पा शहापूरकर (कागणी, ता. चंदगड), सचिन गुंडू पाटील (होसूर, ता. चंदगड), नारायण सुरेश नाईक ( होसूर, ता. चंदगड) हे ऊस शेती तंत्रज्ञ म्हणून काम करत आहेत. गणेशोत्सवाची जगभर ख्याती असून भारतीय लोक ज्या - ज्या ठिकाणी नोकरी निमित्त कार्यरत आहेत, त्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. त्याच पद्धतीने युगांडामध्येही सलग तीन वर्षे दीड दिवसाचा गणेश उत्सव साजरा करण्यात आला. सचिन पाटील यांच्यासह शिवाजी शहापूरकर, नारायण नाईक यांनी माती व लाकडी कोंडा वापरून गणेश मूर्ती तयार केली. बुधवार दि. 31 ऑगस्ट रोजी
त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करून मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा मोरया ! अशा घोषणा देत पूजन करण्यात आले होते. या मध्ये स्थानिक नागरिकांसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गुरुवार दि. 1 रोजी दीड दिवसाने या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
No comments:
Post a Comment