कालकुंद्री येथे सेवानिवृत्त जवानांचा मिरवणुकीने सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2022

कालकुंद्री येथे सेवानिवृत्त जवानांचा मिरवणुकीने सत्कार

सेवानिवृत्त झालेले जवान डावीकडे नायब सुभेदार मारुती वर्पे तर उजवीकडे नायब सुभेदार शिवाजी वरपे.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            कालकुंद्री (ता. चंदगड) येथे इंडियन आर्मी मधील आपल्या २६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेल्या मारुती तातोबा वर्पे (एसीपी, नायब सुभेदार) तसेच शिवाजी महादेव वर्पे (एसीपी, नायब सुभेदार) या दोघांचा सेवानिवृत्ती निमित्त गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. वैशिष्ट्य म्हणजे दोघेही जवान भारतीय सेनेत एकाच दिवशी भरती झाले होते व एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले. तसेच सेवानिवृत्ती वेळी दोघेही एकाच हुद्द्यावरून म्हणजे नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. भारतीय आर्मीत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मित्र मंडळ व ग्रामस्थांनी त्यांचे मिरवणुक काढून अभिनंदन केले व सेवानिवृत्तीनंतरच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment