किणी मॅरेथॉन स्पर्धेत कोणी मारली बाजी? - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2022

किणी मॅरेथॉन स्पर्धेत कोणी मारली बाजी?

किणी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करताना वसंत जोशीलकर, निलेश कदम, सोबत मान्यवर व स्पर्धक.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  किणी (ता. चंदगड) यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त शुक्रवार २ सप्टेंबर रोजी खुल्या ५ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वसंत जोशीलकर व भारतीय सेनादलातील जवान निलेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

           स्पर्धेतील विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे विवेक नारायण मोरे (दाटे), अनिकेत अनंत कुट्रे (चंदगड), परशराम लक्ष्मण भोई (भडगाव, गडहिंग्लज), युवराज मारुती वाकसे (बेळगाव), रोहित विलास भिंगुर्डे (तेउरवाडी), अक्षय शामराव पाटील (किटवाड). विजेत्या धावपटूंना रोख रुपये- २५०१, २००१, १५०१, १००१, ७५१, ५०१ व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी पी जे मोहनगेकर, प्रा आर टी पाटील, सुभाष बेळगावकर, अशोक नौकुडकर, संजय कुट्रे, सुनील मनवाडकर, संभाजी हुंदळेवाडकर, विनायक बिर्जे, अनिल हुंदळेवाडकर, आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment