चिंचणे गावातील तरूणांची शाळेबद्दल आत्मीयता - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2022

चिंचणे गावातील तरूणांची शाळेबद्दल आत्मीयता

रक्तगट तपासणी व ओळखपत्र वितरण प्रसंगी माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ.


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

             आपण ज्या शाळेत शिकून गेलो त्या शाळेबद्दल माजी विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयतेची भावना असेल तर शाळेची प्रगती होण्यास वेळ लागत नाही. चिंचणे (ता. चंदगड) सारख्या छोट्या गावातील तरुणांनी याची वेळोवेळी प्रचिती आणून दिली आहे.

           श्री गणेश चतुर्थी निमित्त माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांना ओळखपत्रे  तयार करून दिली, तर  सचिन चिंचणीकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासून दिले. गेल्या काही दिवसात गावातील माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी लोखंडी कपाट, पंखे, पेन ड्राईव्ह, शालेय शालेय पोषण आहार अधिक सक्षम करण्यासाठी विविध सुविधा पुरवून जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम करण्याचे करण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याचे अनुकरण अन्य मोठ्या गावच्या शाळेतील माजी विद्यार्थी करतील का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. 

             रक्तगट तपासणी कामी सचिन चिंचणीकर यांना शशिकांत सुतार, अभिजीत चौगुले, भारत सुतार, जनार्दन बामणे, राजू सुतार, निलेश चौगुले, महेश बागडी, अविनाश तलवार, अमन कांबळे, तानाजी तळवार, विशाल तळवार, सागर सुतार, शशिकांत मांग, नरेश कांबळे यांनी सहकार्य केले. स्वागत मुख्याध्यापक प्रकाश नांदुडकर यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर पाटील व सदस्य उपस्थित होते. आभार अध्यापक बळवंत लोंढे यांनी मानले.

No comments:

Post a Comment