महागाव / सी. एल. वृत्तसेवा
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चंदगड तालुक्यातील ५५ वर्षीय एका रुग्णाच्या किडनीत गुंतागुंतीच्या ठिकाणी असलेले ६.५ सेंटिमीटर आकाराचे मुतखडा शस्त्रक्रिया येथील डॉक्टरांच्या टीमने यशस्वी करून रुग्णांला जीवदान दिले. ही शस्त्रक्रिया महात्मा फुले आरोग्य योजनेत मोफत झाली आहे.
सदर रुग्णांला गेली अनेक दिवसापासून मूतखड्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन यावर उपचार केले. मात्र त्याचे निदान झाले नाही. काही ठिकाणी गुंतागुंत व खड्याचा आकार मोठा असल्याने शस्त्रक्रिया करण्याचे टाळले होते. अशा परिस्थितीत येथील प्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ. सतीश हनमशेट्टी व डॉ. यशवंत चव्हाण यांच्या टीमने अडीच तासाच्या शस्त्रक्रिया करुन खडा बाहेर काढण्यात यशस्वी ठरले. सध्या रुग्णाची परिस्थिती उत्तम आहे, अशी माहिती डॉ. प्रतिभा व सुरेखा चव्हाण यांनी दिली. दरम्यान रुग्णाने शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल डॉक्टरांचे व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment