घटप्रभा कानडी बंधाऱ्यावर भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाला निरोप - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2022

घटप्रभा कानडी बंधाऱ्यावर भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाला निरोप



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

घटप्रभा  कानडी बंधाऱ्यावर आज अनंत चतुर्थी दिवशी भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. त्यासाठी आज दुपारपासून ट्रॅक्टर  सजवून अगदी थाटात  घरगुती गणपतीसह सार्वजनिक मंडळाचे गणपती  ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात . यासाठी  लहान थोरासह महिला  उपस्थित होत्या. यामध्ये  तरुणांनी लेझीम पथक सादर केले. थोरांनी अभंग गायीले.  त्याचबरोबर महिलांनी  झिम्मा फुगडीचे सादर केली. गेली दहा दिवस बाप्पाच्या आगमनाला घरातील वातावरण अगदी प्रफुल्लित झाले. सगळीकडे आनंदीआनंद होता. दहा दिवस मनोभावे बाप्पांची पूजाअर्चा  केल्यानंतर बाप्पाला निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले. त्याच बरोबर सातवणे येथे गेली दहा दिवस बाप्पाच्या आगमनाने गाव भक्तिमय झाले होते. देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी गर्दी केली होती. सातवणेत सार्वजनिक मंडळाच्या गणपतीची मिरवणूक धूमधडाक्‍यात   वाजत गाजत  झिम्मा फुगडी व फटाक्यांच्या आतषबाजीत सह भक्तिभावाने काढण्यात आली.  केरवडे वाळकुळी,  पोवाचीवाडी, सावर्डे या गावातील सार्वजनिक मंडळाचे गणपती सह घरगुती गणपती आले होते. बंधाऱ्यावर हजारो गणेश भक्तांनी परिसर फुलून गेला होता. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्यात आला. आज दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने बंधाऱ्यावर पायऱ्या घाट नसल्यामुळे मोठ्या मुर्त्यांचे विसर्जन करताना तारेवरची कसरत करावी लागली.

No comments:

Post a Comment